scorecardresearch

ओव्हरहेड वायरला ताडपत्री चिकटल्याने खडवली ते टिटवाळा दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत

कसारा ते मुंबई आणि कल्याण ते कसारा या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे.

plastic sticking to the overhead wire

मध्य रेल्वेच्या खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हर हेड वायरला विद्युत वाहक तारांजवळ असलेली ताडपत्री  चिकटल्याने मध्य रेल्वेची कल्याणकडून कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गेल्या अर्धा तासाहून अधिक वेळ अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली आहे. मेलच्या डब्याला बांधलेली एक ताडपत्री उडून ती ओव्हर हेड वायरला चिकटली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कसारा ते मुंबई आणि कल्याण ते कसारा या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Railway traffic between khadavali and titwala was disrupted due to plastic sticking to the overhead wire abn