निवृत्तिवेतनातून ‘नाम’ला दीड लाख दिले
ठाण्यातील सीनिअर सिटीझन्स क्लबच्या सदस्यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रेरणा मिळेल, असे कार्य केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे निवृत्तिवेतनच उतारवयासाठी आधार असते. मात्र त्यातील काही भाग वेगळा काढून त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
संस्थेच्या सभासदांनी मिळून एक लाख ६५ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ‘नाम फाऊंडेशन’कडे सुपूर्द केला. नुकत्याच पार पडलेल्या सीनिअर सिटीझन्स क्लब या संस्थेच्या वर्धापन दिन समारंभात हा निधी सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांना देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुप्ते कार्यवाह मुकुंद गाडगीळ, उपाध्यक्षा शीला पाटील व सहकार्यवाह बरखा जोशी आदी मंडळी यावेळी उपस्थित होते. कल्बच्या जेष्ठ नागरिकांनी केलेले कार्य समाजामध्ये वेगळा पायंडा पाडणारे ठरले. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior people also helping farmers
First published on: 25-12-2015 at 02:29 IST