ठाण्यामध्ये नवरा-बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आह. एका नराधम पतीने आपल्या स्वतःच्या पत्नीला वैश्या व्यवसायात ढकलले. या कामामध्ये त्याला त्याच्या दोन मित्रांनी सहकारी केले. शुक्रवारी पोलिसांनी मीरा – भाईंदर येथील एका लॉजवर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली होती. या महिलांना वैश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. त्यांची सुटका केल्यानंतर महिला सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट चालवणारे आरोपी ग्राहकांकडून दहा हजार रुपये वसूल करत होते. पोलिसांनी बनावट ग्राहक लॉजवर पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे. आरोपींची जेव्हा चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यातून समोर आलेल्या माहितीनंतर पोलिसही चक्रावून गेले.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

हे ही वाचा >> ‘सोड रे *** आहे तो’ नारायण राणेंचे नाव काढताच संजय राऊत यांची जीभ घसरली; म्हणाले, “गोड बोलण्यासाठी भाजपमध्ये…”

दोन आरोपींपैकी एक आरोपी हा स्वतःच्याच पत्नीकडून वैश्याव्यवसाय करुन घेत होता. पत्नीला बळजबरीने वैश्याव्यवसायात ढकलल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. मानवी तस्करी (प्रतिबंध) या कायद्याचे कलम लावून आरोपींना न्यायालयाच्या समोर उभे केले जाणार आहे.

आजवर अनेक चित्रपटांमधून वेश्या व्यवसाय, त्यात इच्छेविरुद्ध अडकलेल्या मुली, त्यांना सहन करावा लागणारा त्रास दाखविण्यात आला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिस्थितीची दाहकता अनुभवली असेल. परंतु या मुलींना प्रत्यक्षात जो त्रास सहन करावा लागतो त्याचा आपण विचारही करू शकत नाही. या मुलींसाठी अनेक संस्था काम करता. अशीच एक संस्था आहे रेस्क्यू फाउंडेशन. त्रिवेणी आचार्य यांनी आपल्या पतीला सोबतीला घेऊन २००० साली या संस्थेची स्थापना केली होती. त्रिवेणी आचार्य यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजवर ५ हजारपेक्षाही जास्त मुलींना सोडवलं आहे.