ठाण्यातील वागळे इस्टेट येथील अंबिकानगर परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाने शेजारच्या दोन अल्पवयीन मुलींना मोबाइलवर गेम खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. अत्याचाराला बळी पडलेली एक मुलगी नऊ वर्षांची तर दुसरी अवघ्या सहा वर्षांची आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी पवन जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १७ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

क्षुल्लक कारणावरून तरुणाची आत्महत्या

ठाणे : मित्रांबरोबर बाहेर जाऊ नकोस, विनाकारण फिरू नकोस असा वडिलांनी सल्ला दिल्याने रागाच्या भरात एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. शिवशाही कदम असे या तरुणाचे नाव असून हा उल्हासनगर येथील अण्णा भाऊ साठे नगर येथे राहत होता. वडिलांच्या बोलण्याच्या रागाने या तरुणाने घराजवळ असलेल्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवशाही कदम याचा खुच्र्या दुरुस्त करण्याचा व्यवसाय होता. शनिवारी वडील त्याला रागावले. याचा राग आल्याने त्याने घराजवळच्या झाडाला गळफास घेतला. वडिलांना आणि शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual abuse by minor girls in thane
First published on: 13-06-2016 at 02:48 IST