वारंवार तक्रार करूनही कारवाईस वसई-विरार पालिकेची टाळाटाळ
वसईकर आधीच रस्त्यावरील फेरीवाले आणि वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असताना त्यात शोरूम चालकांनी बेकायेदशीरपणे वाहने उभी करून अतिक्रमण केले आहे. मुख्य रस्त्यांवर वाहनांचीे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे अनेक शोरूम्स असून त्यांचीे शेकडो वाहने बेकायदेशीेपणे रस्त्यावर उभीे केलेलीे आहेत.
वसईच्या माणिकपूर, अंबाडी रोड आणि बाभोळा तसेच पूर्वेकडील एव्हरशाइन रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर अनेक खाजगीे गाडय़ांच्या शोरूम आहेत. या शोरूम्सच्या शेकडो गाडय़ा मुख्य रस्त्यावरच प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता अडवला गेला असून वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्यावर कारवाई झालेली नाही. नुकतेच पालिकेने अंबाडी रस्त्यावरील टेम्पो वाहनतळ बायपास रोडवरील मुक्तिधाम नगर येथे हलवल्याने काही प्रमाणात हा रस्ता मोकळा झाला आहे. परंतु अनेक मोठय़ा कंपन्यांच्या शोरूम्समधील गाडय़ांनी रस्ता अडवून ठेवलेला आहे.
वाहतूक पोलिसांबरोबर या प्रश्नावर चर्चा केली आहे. शोरूम्सच्या मालकांना वाहने हटविण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यांनी त्या हटविल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई सुरू केलीे जाईल
– प्रकाश बिराजदार, पोलीस निरीक्षक, 
माणिक पूर पोलीस ठाणे.