scorecardresearch

Premium

ठाणे : साहेब… आम्हाला ताटकळत ठेवलं… दिव्यांगाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्यक्रमाच्या आयोजनावरून तक्रार

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच एका दिव्यांग मुलाने शिंदे यांच्याकडे कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी तक्रार केली.

specially abled children complain to CM
ठाणे : साहेब… आम्हाला ताटकळत ठेवलं… दिव्यांगाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कार्यक्रमाच्या आयोजनावरून तक्रार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच एका दिव्यांग मुलाने शिंदे यांच्याकडे कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी तक्रार केली. आम्हाला ताटकळत ठेवण्यात आले. जेवण वेळेत मिळाले नाही असे त्या मुलाने सांगितले. त्यांनतर शिंदे यांनी त्या मुलाची समजूत काढली.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संचालित स्वयम पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने रविवारी दिव्यांगांसाठी मोफत उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो दिव्यांग आले होते. दुपारी मुख्यमंत्री या कार्यक्रमास आले असता एक दिव्यांग मुलगा त्यांच्या जवळ आला आणि त्याने कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी थेट शिंदे यांच्याकडेच तक्रार केली.

pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार
Chief Minister eknath shindes schedule in Kolhapur delayed Citizens are suffered as program did not start on time
मुख्यमंत्र्यांचे कोल्हापुरातील वेळापत्रक अंमळ उशिरा; कार्यक्रम वेळेत सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त
Confusion in Thackeray group deputy leader Sushma Andhare program in nagar
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; पोलीस संरक्षणात झाला कार्यक्रम

हेही वाचा – कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खा – डॉ. जगन्नाथ दीक्षित; वजन आणि मधुमेह कमी करण्याचा मार्ग

हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चारजण जखमी

आम्हाला खूप वेळ ताटकळत ठेवले गेले. जेवण वेळेत मिळाले नाही असे त्या मुलाने मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. त्यांनतर शिंदे यांनी त्या मुलाची समजूत काढली. या प्रकाराविषयी स्वयम संस्थेला विचारले असता, आपण सर्वांना खाद्य पदार्थांचे वाटप केल्याचा दावा केला. तसेच जिल्ह्याच्या बाहेरूनदेखील अनेक जण आले होते. त्यामुळे गर्दी झाली होती असेही त्यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Specially abled children complain to cm eknath shinde about the organization of the event ssb

First published on: 03-12-2023 at 17:15 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×