scorecardresearch

Premium

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चारजण जखमी

मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका जवळ रविवारी सकाळी ट्रकची एका टँकरला धडक बसली. या अपघातात चार जण जखमी झाले.

Four injured in horrific accident on Mumbai-Nashik highway
हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका जवळ रविवारी सकाळी ट्रकची एका टँकरला धडक बसली. या अपघातात चार जण जखमी झाले. ट्रक चालक इजाज अहमद (४०), त्याचा सहकारी राशिद अब्दुल (२६), प्रवासी अमजर खान (३५), अब्दुल समत (२३) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

new phase of Samruddhi Highway, bharvir, igatpuri, Monday
समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत, आता इगतपुरीपासून थेट…
Mumbai Pune Expressway The area near Khalapur toll plaza will be free of traffic congestion Mumbai news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: खालापूर पथकर नाक्याजवळील परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार
one man dead 2 injured after hitting a bike on highway
महामार्गावर दुचाकीला ठोकरल्याने १ तरुण ठार, २ जखमी
nashik borivali electric bus marathi news, nashik to borivali st bus marathi news
नाशिक-बोरीवली मार्गावर बुधवारपासून इलेक्ट्रिक बससेवा

नाशिक येथील मालेगावमधून ट्रक मुंबईच्या दिशेने वाहतुक करत होता. या ट्रकमध्ये आठ प्रवासी प्रवास करत होते. तसेच १२ टन मैदा होता. रविवारी सकाळी ६ वाजता हा ट्रक खारेगावजवळ आला असता, इजाज अहमद यांचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक समोरील एका टँकरला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.

आणखी वाचा-कल्याणमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संभाजीनगर मधून अटक

तसेच ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात इजाज यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अमजर यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. राशीद आणि अब्दुल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यातील अब्दुल यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. उर्वरित तिघांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने रस्त्यामधून बाजूला करण्यात आली आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four injured in horrific accident on mumbai nashik highway mrj

First published on: 03-12-2023 at 11:49 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×