Dombivli MIDC Blast Latest: डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला आहे. त्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले आहेत. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला आहे. डोंबिवली एमआयडीसी भागातल्या नेमक्या कुठल्या कंपनीत हा स्फोट झाला? ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहेत. या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकी काय घडली घटना?

डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल या कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला. पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त होते आहे. डोंबिवली अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या व रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. एमआयडीसी सागाव साईबाबा मंदिर मागे कंपनीत बॉयलरच स्फोट झाला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेतून राख पडत आहे. अंबर केमिकल्समध्ये स्फोट झाल्यानंतर रस्त्यावरर मोठ्या प्रमाणावर राख उडाली आहे. तसंच मोठे लोखंडी कणही उडाले आहेत. राख वाहनांवर पडते आहे, तसंच स्फोटांचे आवाज येत होते त्यामुळे एमआयडीसी निवासी विभागांतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Varsha Gaikwad
“मतदानानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला अन्…”; वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग

हे पण वाचा- लोकसत्ता विश्लेषण : डोंबिवली कारखाने स्थलांतर – प्रदूषणातून मुक्ती, रोजगाराचा प्रश्न!

श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटलं आहे?

बॉयलरचा स्फोट झाला आहे. त्यामुळे कंपनीत आग लागली आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. जखमींना आम्ही विविध रुग्णालयात दाखल केलं आहे. ३० ते ३५ जण या घटनेत जखमी झाली आहे. अतिधोकादायक रसायनं तयार करणाऱ्या कंपन्या शहराच्या बाहेर नेल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. आम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आम्ही चर्चा करुन याविषयीचा निर्णय घेऊ. येत्या सहा महिन्यांत इथल्या अतिधोकादायक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या शहराबाहेर कशा नेता येतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- डोंबिवलीतल्या स्फोटानंतर एमआयडीसीवर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप; म्हणाले “फायर ऑडिट…”

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने सांगितलं की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असं कामगाराने टीव्ही ९ ला सांगितलं.

काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.