ठाणे – पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शनजवळ एसटी बस एका कंटेनरला धडकल्याने बसगाडीतील वाहकासह महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाहक अमर परब (३८) आणि गीता कदम (४१) अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हेही वाचा – एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकासारखी पूनरावृत्ती टाळण्यासाठी ठाणे स्थानकात तात्काळ उपाययोजना करा; राजन विचारे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन येथील ज्युपिटर रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावरून कंटेनर जात होता. त्याचवेळी या मार्गावरून बोरिवली येथे जाणारी एसटी बसगाडी आली. ही बसगाडी कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की बसगाडीच्या पुढील भागाचा चुराडा झाला. यात वाहक अमर परब आणि प्रवासी गीता यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बसगाडीत नऊ प्रवासी प्रवास करत होते.