ठाणे : शिळ-डायघर येथील पडले गाव भागात मोटार पुढे जाऊ दिली नाही म्हणून तीन जणांनी राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) चालकास मारहाण केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी चालक गोरख कसबे (५२) हे रविवारी सायंकाळी उरण येथून कल्याणच्या दिशेने बसगाडी घेऊन जात होते. त्यांची बसगाडी डायघर येथील पडले गावात जात असताना एक मोटार चालकाने त्याची मोटार बसगाडी समोर थांबविली. मोटार पुढे जाऊ दिली नाही म्हणून त्याने बसगाडीमध्ये शिरून चालकास शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यास वाहकाने विरोध केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

हेही वाचा >>> रस्ते कामांमुळे ठाणे कोंडण्याची शक्यता?, मे महिना अखेरपर्यंत सर्वच कामे उरकरण्याचे पालिकेचे उद्दीष्ट

त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या आणखी दोन साथिदारांना मोबाईलवरून संपर्क साधून बोलावले. त्याच्या साथिदारांनीही चालकाला बसगाडीमध्ये शिरून मारहाण केली. या घटनेनंतर वाहकाने १०० क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस येत असल्याचे पाहून तिघांनीही पळ काढला. या घटनेप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St driver beating case has been registered police station police searching accused ysh
First published on: 23-01-2023 at 16:22 IST