क्रिकेट विश्वासाठी अत्यंत उत्कंठावर्धक व बहुप्रतिक्षित अशा टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान या पांरपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या संघांचा सामना आज खेळला जात आहे. हा सामना दुबईत सुरू आहे. तर, देशभरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्याताली येऊर येथे गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
येऊरच्या प्रवेशद्वारावर स्थानिक विरूद्ध पर्यटकांमध्येचं जुंपली आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांचा रांगा लागल्या आहेत. क्रिकेट सामन्याची मजा घेण्यासाठी येऊरमधील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोठमोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर क्रिकेटप्रेमी येत आहेत. तर, त्यांची वाहने मुख्य प्रवेशद्वारावरच अडवली गेली आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हे पर्यटक या ठिकाणी दारू पिऊन बाटल्या फोडतात व धिंगाणा घालतात.
मी येऊर गावाचा रहिवासी व काँग्रेसचा वॉर्ड अध्यक्ष आहे. आज येऊर गावात क्रिकेटचा सामना बघण्यासाठी मोठ्याप्रमाणावर पर्यटक आले असून, त्यांच्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला देखील निवेदन दिलेले आहे. मात्र काहीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या येऊर मध्ये मोठ्याप्रमाणावर धिंगाणा सुरू आहे. या ठिकाणी बाहेरून येऊन दारू पिऊन काचेच्या बाटल्या फोडून गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाचं प्रवेशद्वार बंद केलं आहे. अशी प्रतिक्रिया येऊरच्या एका ग्रामस्थाने दिली.