ठाणे : ज्येष्ठ करसल्लागार शरद भाटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अर्थविषयक आकड्यांचे गणित सोप्या भाषेत समजावून ते नागरिकांना मार्गदर्शन करत. लोकसत्तामधील त्यांचे अर्थज्ञानावरील सदरही लोकप्रिय होते.   १९८१ मध्ये बँकेतील नोकरी सोड़ून ते पूर्ण वेळ करसल्लागार म्हणून काम करू लागले. लोकसत्तामध्ये त्यांचे अर्थज्ञानावरील सदरही  होते. हा विषय अतिशय सोप्या भाषेत या सदरामध्ये त्यांनी मांडला होता.  तसेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर परिपत्रकातील बारकावे, करामधील बदलाची माहिती सहज-सोप्या भाषेत तयार करून स्वखर्चाने छापून ते असंख्य करदात्यांना पत्राद्वारे पाठवीत असत. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी हा उपक्रम राबविला होता. करसल्लागार म्हणून काम करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही ठसा उमटवला होता. माणगाव तालुक्यातील एका वृद्धाश्रमात  ते सेवा करण्यासाठी जात असत. त्यांनी या वृद्धाश्रमास विविध प्रकारे आर्थिक मदतही मिळवून दिली होती. बाबा आमटे यांच्या आनंदवनातही ते दोन वेळा गेले होते. तिथे त्यांनी श्रमदान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tax advisor sharad bhate passes away akp
First published on: 12-09-2021 at 00:17 IST