ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील चारही आरोपी नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी वाढ करण्यात आली असून ठाणे न्यायालयाने या चौघांना येत्या ११ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ठाणे पोलिसांनी सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी नगरसेवक हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि नजीब मुल्ला या चौघांना अटक केली होती. ठाणे न्यायालयाने चौघांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच चौघांनी जामीनासाठी अर्ज केले होते, मात्र ठाणे न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत. त्यामुळे सध्या चौघेही ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे चौघांना सोमवारी ठाणे न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2015 रोजी प्रकाशित
परमारप्रकरणी नगरसेवकांच्या कोठडीत वाढ
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे चौघांना सोमवारी ठाणे न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 29-12-2015 at 00:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane corporators custody extended in parmar case