प्रशासकीय कामकाजात गतिमानता, सुसूत्रता आणि अधिक पारदर्शकता आणण्याच्या हेतूने अनेक योजना इंटरनेटद्वारे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यातच स्वातंत्र्य दिनापासून ठाणे जिल्ह्य़ातील सातबारा उतारे आता ऑनलाइन मिळणार आहेत. या योजनेची सुरुवात मंगळवारी स्वातंत्र्य दिनाचा समारंभ झाल्यानंतर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात बसविलेल्या किऑस्क यंत्राद्वारे नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्य़ात एकूण एक हजार एक गावे आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १०१ गावांचे सातबारे ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. या सर्व गावांमध्ये ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देणारी यंत्रणा डिजिटल स्वाक्षरीसह नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्या उपविभागीय तसेच तहसील कार्यालयांमध्ये कंपन्यांच्या सामाजिक उत्तरादायित्व योजनेतून ही यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्य़ात ४४ ठिकाणी ही यंत्रणा असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक आदी या प्रसंगी उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district satbara utara to get online
First published on: 16-08-2017 at 00:30 IST