अभिनेत्री सुप्रिया पाठक हे नाव आता घराघरात पोहचले आहे. ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘पुढचं पाऊल’ या मालिका व ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ यातील भूमिकांसाठी त्या गाजत आहेत. स्टँडअप कॉमेडीकडे वळण्यापूर्वी ‘वात्रट मेले’, ‘वय वर्षे पंच्चावन्न’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारख्या २०-२२ विनोदी नाटकांतून त्यांनी अभिनय tv06केला आहे. ‘कुलवधू’ या मेगा सिरीयलद्वारे चरित्र भूमिकांकडे त्या वळल्या.
*आवडता मराठी चित्रपट – अशी ही बनवाबनवी
*आवडता हिंदी चित्रपट – पडोसन
*आवडतं नाटक – तू तू मी मी, रानभूल
*आवडता टीव्ही कार्यक्रम – केबीसी
*आवडता खाद्यपदार्थ – मासे
*आवडती भूमिका – खंडोबाचं लगीन या नाटकातली म्हाळसा. या भूमिकेसाठी शासनाचा पुरस्कार मिळाला.
*आवडता अभिनेता – अमिताभ बच्चन
*आवडती अभिनेत्री – माधुरी दिक्षित
*आवडती चरित्र अभिनेत्री – अतिशा नाईक, संपदा जोगळेकर
*आवडते चरित्र अभिनेते – आनंद अभ्यंकर, शरद पोंक्षे
*आवडता फूड जॉईंट – प्रशांत कॉर्नर
*आवडतं हॉटेल – मक्र्युरी, सत्कार, युनायटेड २१, व्हेज सिझलर्स
*कोणते माध्यम अधिक आवडते?
‘फू बाई फू’ या कार्यक्रमामुळे मला विनोदी अभिनेत्री अशी ओळख मिळाली. खलनायिकी छटेच्या भूमिका मालिकांमधून करत असल्यामुळे सुरुवातीला ‘फू बाई फू’च्या ऑडीशन्समधून मला नाकारले होते. याचे कारण १६ वर्षांत जवळजवळ २०-२२ विनोदी नाटकांतून काम केल्याचे त्यांना आठवत नव्हते. मात्र अखेरीस ‘फू बाई फू’मधून मी काम करू लागल्यावर मला खऱ्या अर्थाने विनोदी अभिनेत्री अशी ओळख मिळाली हे निश्चित. तिन्ही माध्यमांमध्ये मला टीव्ही माध्यमच मला अधिक आवडते, कारण त्यामुळे थेट प्रेक्षकांच्या घरापर्यंत पोहचता येते. सध्या मी ‘मदर्स डे’ हे नाटक करतेय. होणार सून.. मधील आम्ही चार सासवा या नाटकातदेखील आहोत. नाटक पाहिल्यावर प्रेक्षक भेटतात, तेव्हा नाटकातील भूमिकेपेक्षाही टीव्हीवरील भूमिकांचे कौतुक करतात. अर्थात तीनही माध्यमांची बलस्थाने वेगवेगळी आहेत, हेही तितकेच खरे.
ल्लठाणे शहराविषयी..
२०००पासून वर्तकनगरला मी राहत आहे. मूळची मुंबईतली असले तरी ठाण्यात राहायला आल्यानंतर ठाणे शहर सोडून जावे, असे वाटले नाही. ठाण्याला सांस्कृतिक वारसा असल्यामुळे ठाण्यातील नाटय़प्रयोग हा हमखास रंगतोच. त्यातही गडकरी रंगायतनचा प्रयोग आणखीनच मजा आणतो. शूटींगसाठी गोरेगाव, मढ आयलंड असे पश्चिम उपनगरात जावे लागत असले तरी तो दोन-एक तासाचा प्रवास करून पुन्हा ठाण्यात यावेसे वाटते. वेळी अवेळी ठाण्यात येताना कधीच कसली भीती वाटत नाही. मुंबईच्या तुलनेत ठाणे हे सर्वाधिक सुरक्षित शहर आहे, असे मला वाटते.
संकलन – सुनील नांदगावकर