मीरा-भाईंदरचा पार्किंग प्रश्न सुटणार

भाईंदरमधील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न येत्या शनिवारपासून बऱ्याच अंशी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्यावतीने मीरा रोड येथील कनाकिया मार्गावरील खासगी भूखंडावर उभारण्यात आलेल्या बहुमजली वाहनतळावर एकावेळी सुमारे शंभर वाहने उभी करण्याची क्षमता आहे.

शहरातील पहिले बहुमजली वाहनतळ शनिवारी खुले
मीरा-भाईंदरमधील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न येत्या शनिवारपासून बऱ्याच अंशी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्यावतीने मीरा रोड येथील कनाकिया मार्गावरील खासगी भूखंडावर उभारण्यात आलेल्या बहुमजली वाहनतळावर एकावेळी सुमारे शंभर वाहने उभी करण्याची क्षमता आहे. येत्या शनिवारी पालिकेच्या पाणी योजनेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. त्याच दिवशी या वाहनतळाचे लोकार्पण होणार आहे.
मीरा रोड येथील कनाकिया मार्गावरील खासगी भूखंड वाहनतळासाठी आरक्षित ठरवण्यात आला होता. महानगरपालिकेने जमीन मालकाकडून एकही पसा खर्च न करता विकसित करून घेतले आहे. बदल्यात विकासकाला त्या जागेचा टीडीआर देण्यात आला आहे. दोन मजली असलेल्या या वाहनतळात सुमारे शंभर गाडय़ा उभ्या करण्याची क्षमता आहे. मीरा-भाईंदरमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने गाडय़ा उभ्या करण्याची मोठीच डोकेदुखी आहे. महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्त्यांवर गाडय़ा उभ्या करण्यासाठीची नियमावली केली आहे. जागोजागी नो पार्किंग, सम व विषम तारखेला गाडय़ा उभ्या करण्याचे फलक लावण्यात आले आहेत. तरीदेखील वाहनचालक बेशिस्तपणे वाहने उभी करत असतात. या पाश्र्वभूमीवर हे वाहनतळ उपयुक्त ठरणार आहे. हे वाहनतळ महानगरपालिका स्वत: चालविणार की त्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करणार, याबाबत महासभेने निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी दोन वाहनतळ
पालिकेच्या विकास आराखडय़ात नऊ ठिकाणी वहानतळांसाठी आरक्षणे आहेत. यापकी प्रत्यक्षात तीन जागाच महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. मीरा रोड परिसरातील पूनम गार्डन व रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांची बांधकामे सुरू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The first multistoreyed parking stand open on saturday

ताज्या बातम्या