बदलापूर बाजारपेठ परिसरात होम फलाटाच्या उभरनीनंतर उरलेल्या जागेत विनापरवानगी बांधलेल्या ३५ एकमजली गाळ्यांवर शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासने कारवाई करत हे गाळे जमिनदोस्त केले. तीन महिन्यांपूर्वी येथील व्यापाऱ्यांनी हे गाळे उभे केले होते. या गाळ्यांना अभय देण्यासाठी काही लोकप्रतिनिधीही पुढे आले होते. मात्र चुकीचा संदेश जात असल्याने पालिका प्रशासनाने या गाळेधारकांना नोटीस देऊन इशारा दिला होता.

हेही वाचा >>>ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव आता अंबरनाथमध्ये; पालिकेकडून बांधकामाची निविदा जाहीर, खेळाडूंना अंबरनाथमध्ये मिळणार सुविधा

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

बदलापूर स्थानक परिसरात पश्चिमेला असलेल्या बाजारपेठ भागात अनेक वर्षांपासून रेल्वेच्या शेजारी अनेक दुकाने अस्तित्वात होती. रस्ते रूंदीकरणआड येणाऱ्या दुकानांवर सहा वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्याधिकारी देविदास पवार यांनी धडक कारवाई केली होती. त्यानंतर स्थानक परिसरातील प्रमुख रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. पुढे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या होम फलाटासाठी रेल्वे प्रशासनातर्फे जागा निश्चित करण्यात आली. यानंतर दुकानांची जागा अरूंद झाली. मात्र वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी गाळे याच ठिकाणी बांधण्याचा व्यापाऱ्यांचा आग्रह होता. होम फलाटाची जागा निश्चिती आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यांपूर्वी येथील व्यापाऱ्यांनी उरलेल्या जागेत गाळे उभे करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर येथील बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली होती.

हेही वाचा >>>डोंबिवली: सामान्य शाळांमधील मूलभुत सुविधांसाठी लोकसहभाग महत्वाचा; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

मात्र या तळमजला आणि पहिला मजला अशा गाळ्यांच्या उभारणीवेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली गेली नसल्याचे समोर आले. याप्रकरणी मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. त्यामुळे याबाबत मार्गदर्शन प्राप्त होताच कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने या गाळेधारकांना नोटीस देण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम स्वतः जमिनदोस्त करा अन्यथा कारवाई होईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिले होता. गाळे धारकांनी आपले बांधकाम वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केली होती. मात्र अखेर दिलासा न मिळाल्याने शुक्रवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने धडक कारवाई करत हे ३५ गाळे जमिनदोस्त केले. यावेळी तीन यंत्र वापरण्यात आले. सुमारे १०० पोलिस, सुरक्षा मंडळाचे रक्षक आणि रेल्वे पोलीस यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>भिवंडी महापालिकेकडून थकबाकीदरांना दणका; थकबाकीदारांच्या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु

गाळेधारकांनी अनधिकृत बांधकाम केले होते. त्यामुळे ३५ गाळ्यांच्या २० मालकांना नोटीस देण्यात आली होती. त्याप्रकरणी मार्गदर्शन प्राप्त होताच कारवाई करण्यात आली. जागेची मालकी गाळेधारकांकडेच आहे. त्यांनी प्रक्रिया राबवून ही बांधकामे करण्याची गरज आहे. – योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.