tmt01tmt02 मध्यवर्ती ठिकाणी असलेले कौपीनेश्वर मंदिर ठाणे शहराच्या प्राचीनत्वाची एक ठळक खूण आहे. या मूळच्या शिलाहारकालीन मंदिराचा अठराव्या शतकात (इ.स. १७६०) ठाण्यातील सरदार रामाजी महादेव बिवलकर यांनी जीर्णोद्धार केला. केवळ धार्मिकच नव्हे, तर ठाणे शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात या मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे. विविधरंगी ठाणे शहराला एका सूत्रात बांधणारा तो एक प्रमुख धागा आहे. आता महानगराचा अवतार धारण केलेल्या ठाणे शहराचा तो मूळ चेहरा आहे. म्हणूनच दशकभरापूर्वी सुरू झालेल्या नववर्ष स्वागत यात्रेचे यजमानपद कौपीनेश्वर न्यासाकडे सोपविण्यात आले. बाजारपेठेतील गजबजाटातही हे मंदिर धीरगंभीर शांतता टिकवून आहे.
(संग्राहक- प्राच्य विद्या संशोधन केंद्र, ठाणे/ नवे छायाचित्र-दीपक जोशी)