ठाणे : पर्यटन कंपन्यांच्या संकेतस्थळावर चांगले गुणांकन (रेटींग) दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील असे सांगून काही भामट्यांनी एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा >>> ठाणे शहरात बुधवारी पाणीपुरवठा नाही

फसवणूक झालेला तरुण घोडबंदर भागात राहतात. ते एका आयटी कंपनीत कामाला आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मोबाईलमधील टेलिग्राम ॲपवर अंजली शर्मा नावाने एक संदेश आला होता. पर्यटन घडवून आणणाऱ्या कंपन्यांच्या संकेतस्थळावर खोटे रेटिंग दिल्यास घरबसल्या दिवसाला १ हजार ते दिड हजार रुपये मिळतील. असे या संदेशात सांगण्यात आले होते. तरूणाने या कामास सहमती दर्शविल्यानंतर त्याला एक संकेतस्थळ प्राप्त झाले. त्यानंतर या तरूणाने त्याच्या बॅंक खात्याची माहिती या संकेतस्थळावर भरली.

हेही वाचा >>> ठाण्यातील विद्यार्थ्यांनी घेतले वारली चित्रकलेचे प्रशिक्षण;  समता विचार प्रसारक संस्थेचा अभिनव उपक्रम

सुरूवातीला कंपनीने दिलेले एक कार्य पूर्ण केले. त्यानंतर तरुणाच्या खात्यात सुमारे ७५० रुपये आले. काही दिवसांनी त्यांना कंपनीने संपर्क साधून पर्यटन करू इच्छिणाऱ्यांना विश्वास बसावा म्हणून दोन हाॅटेलसाठी २३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हे कार्य पूर्ण करून रेटींग दिली असता त्यांच्या खात्यात २७ हजार रुपये आले. त्यानंतर पैसे भरण्याची रक्कम कंपनीने ७ ते ८ लाख रुपयांवर नेली. त्यामुळे तरूणाने टप्प्याटप्प्याने २७ लाख ५० हजार रुपये कंपनीकडे जमा केले. परंतु कंपनीने जमा करण्याची रक्कम सातत्याने वाढवू लागल्याने तरूणाने रेटींग देण्याचे काम बंद केले. तरूणाने पैसे मागितले असता कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.