वालीव पोलिसांनी जप्प केलेल्या कोटय़ावधी रुपयांच्या मुद्देमालावर त्याच पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. शरीफ शेख असे या पोलिसाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. वालीव पोलिसांनी जप्त केलेल्या दोन कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट त्याने परस्पर विकून टाकल्या होत्या.

वालीव पोलिसांनी कारवाई करून १५० बॅगा भरून विदेशी कंपनीच्या सिगारेट आणि अन्य तंबाखू  पदार्थ जप्त केले होते. यावेळी अन्न व औषध प्रसासनाने या मालाची किंमत ३ कोटी २४ लाख रुपये असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. हा सर्व मुद्देमाल वालीव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. तो साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख यांच्या ताब्यात होता. ११ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरम्णी शेख  शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली.