डोंबिवली– डोंबिवलीतील टिळकनगर मधील एका महिलेच्या घरात कुर्ता बदलण्याचा बहाणा करुन येऊन घरातील तीन लाख १९ हजाराचा ऐवज एका शिक्षिकेने लंपास केला आहे. मंगळवारी सकाळी सात ते आठ वेळात ही घटना घडली आहे. या चोरट्या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

कविता सागर गुधाटे (४१, रा. मातृश्रध्दा सोसायटी, टिळकनगर, डोंबिवली) असे तक्रारदार नोकरदार महिलेचे नाव आहे. अमिषा नीमेश अशेर (३८, रा. दीप्ती नवल सोसायटी, जिजाईनगर, डोंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिकेने सोन्याचे ६७ हजार ५०० रुपये, २७ हजार, ९० हजार, एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे जवाकिसु, बांगड्या, झुमका, सोनसाखळी, सोन्याचे कडे चोरुन नेले आहेत, अशी कविता गुधाटे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

पोलिसांनी सांगितले, शिक्षिका अमिषा अशेर या मंगळवारी कुर्ता बदलण्याचे निमित्त करुन सकाळी सात वाजता कविता गुधाटे यांच्या घरी आल्या. एका खोलीत ती कुर्ता बदलत असताना तिने तक्रारदार कविता यांच्या घरातील कपाटातील सोन्याचा ऐवज चोरला. अमिषा निघून गेल्यानंतर कविताने काही कामानिमित्त कपाट उघडले. तेव्हा तिला धक्काच बसला. तिला कपाटातील तिजोरीतील सोन्याचा तीन लाखाचा ऐवज गायब असल्याचे दिसले. आपण घरात असताना, चोरीची कोणतीही लक्षणे दिसत नसताना ऐवज गेला कोठे. असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शिक्षिका अमिषा हिनेच ही चोरी केली असण्याचा संशय व्यक्त करुन कविताने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करुन शिक्षिका आमिषाला अटक केली आहे.