पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर मार्गिकेवर वाहतूक बदल

पूर्व द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे ५ पर्यंत व रविवारी रात्री ११.४५ ते सोमवारी पहाटे ५ पर्यंत बदल लागू असतील.

ठाणे : वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. यासाठी  पूर्व द्रुतगती मार्गावरील नितीन कंपनी येथे व घोडबंदर येथील कापूरबावडी ते कासारवडवली मार्गावर तुळई उभारली जाणार आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग आणि घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल लागू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर रविवारी पहाटे ५ पर्यंत व रविवारी रात्री ११.४५ ते सोमवारी पहाटे ५ पर्यंत बदल लागू असतील. मुंबईहून नितीन कंपनी उड्डाणपुलावर जाणाऱ्या वाहनांना मुख्य मार्गावरून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहने एलआयसी जंक्शन येथून सेवा रस्त्यावरून पुढे जाऊ शकतील. रविवार ते मंगळवार या दिवशी दररोज रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील अवजड वाहने कापूरबावडी येथून उजवीकडे वळण घेऊन बाळकुम, काल्हेर मार्गे वा माजिवडा उड्डाणपुलाखालून खारेगावच्या दिशेने जातील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Traffic changes on the eastern expressway and ghodbunder corridor akp