कल्याण – येथील पूर्व भागात राहणाऱ्या एका आठ वर्षाच्या मुलीवर एका खासगी शिकवणी चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीला आला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ हालचाल करून परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिकवणी चालकाला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार

अजितकुमार साहू असे अटक शिकवणी चालकाचे नाव आहे. तो विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञानाचे शिकवणी वर्ग घेतो. अल्पवयीन मुलगी या शिकवणी वर्गाला नियमित जात होती. शनिवारी घरी आल्यानंतर मुलीची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. ती अस्वस्थ होती. आई, वडिलांनी तिला विश्वासात घेऊन तिला विचारले त्यावेळी शिकवणी चालक साहू आपल्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे मुलीने सांगितले. हा प्रकार ऐकून पालक अस्वस्थ झाले. त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात चालक साहू विरूध्द तक्रार केली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. साहू मूळचा ओडिसा राज्यातील रहिवासी आहे. तो तेथे पळून जाण्याची तयारी घरात करत होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांनी साहू याचे कल्याण पूर्व भाकातील घर शोधून त्याला घरातून अटक केली. पोलीस निरीक्षक निशा चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.