शहापूर : शहापूर येथील बामणे फाटा भागात बुधवारी रात्री दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झाली. या धडकेत तकदिर मुकणे (३०) आणि सागर गोरे (३२) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तकदिर याच्यासोबत दुचाकीवरील दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साकरवाडी येथे राहणारा तकदिर हा त्याच्या दुचाकीवरून दिपक मोरघे आणि प्रमोद विशे याच्यासोबत शहापूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी सागर गोरे याच्या दुचाकीला त्याच्या दुचाकीची समोरून धडक बसली. यात तकदिर आणि सागर यांचा मृत्यू झाला. तर दिपक आणि प्रमोद यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.