ठाणे : नौपाडा येथील बी-केबीन परिसरात इमारतीच्या पायाभरणीदरम्यान मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. हबीब शेख आणि रणजित अशी मृतांची नावे आहेत. तर एकजण या घटनेत जखमी झाला आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिक्षा

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला म्हणून गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांवर गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बी-केबिन परिसरात एका इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू होते. गुरुवारी सांयकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास येथे काम करणाऱ्या तिघांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. त्यामुळे तिन्ही कामगार मातीच्या ढिगाऱ्यात अडकले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, नौपाडा -कोपरी प्रभाग समितीचे उपायुक्त शंकर पाटोळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे पथक, नौपाडा पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ढिगाऱ्यातून हबीब, रणजित आणि निर्मल या तिघांना बाहेर काढण्यात आले. परंतु हबीब आणि रणजित यांचा मृत्यू झाला होता. तर निर्मल हे जमखी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.