ठाणे येथील टिकुजिनीवाडी भागात गुरुवारी सायंकाळी आमदार संजय केळकर यांच्या अभिनंदनाचे फलक लावत असताना विद्युत तारेचा शॉक लागून दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली. कादिर शेख (२०) आणि रामप्रकाश (१९) अशी दोघांची नावे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी कादिरची प्रकृती चिंताजनक आहे. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नामुळे टिकुजिनीवाडी परिसरात गतिरोधक बसविण्यात आले आहेत. यामुळे त्यांचे अभिनंदन करणारे फलक हे दोघजण लावत होते. त्यावेळी विद्युत तारेचा शॉक लागून हे दोघे जखमी झाले, अशी माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2015 रोजी प्रकाशित
विजेचा शॉक लागून दोघे जखमी
ठाणे येथील टिकुजिनीवाडी भागात गुरुवारी सायंकाळी आमदार संजय केळकर यांच्या अभिनंदनाचे फलक लावत असताना विद्युत तारेचा शॉक लागून दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली.
First published on: 28-02-2015 at 12:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two injured by electrical shock