दोन लहान मुलांनी दुकानातून ५० पैशाची चकली चोरी केल्याच्या कारणावरुन दुकानदाराने त्यांना अघोरी शिक्षा दिल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. चकली चोरलेल्या दोन्ही लहान मुलांचे अर्धे केस कापून त्यांना चपलांचा हार घालून परिसरात नग्न धिंड काढण्यात आली. या प्रकारानंतर दोन्ही मुलांचे नग्न अवस्थेत व्हिडीओ काढून सोशल मीडियामध्ये व्हायरल देखील करण्यात आले.
हा संपूर्ण प्रकार चिमुरड्यांच्या घरच्यांसमोर आल्यानंतर मुलांच्या आईन परिसरातील हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणातील पुढील तपास सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये शनिवारी सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार घडला. आठ आणि नऊ वर्षाची दोन मुले घराबाहेर खेळत होती. यावेळी जवळ असलेल्या किरणांचा दुकानातल्या बरणीत ठेवलेली चकली पाहून या दोघांना ती मिळवण्याचा मोह झाला.  या दोन्ही मुलांनी बरणीतील चकली घेतली. त्यानंतर चकली चोरी केली म्हणून दुकान मालक असलेल्या इरफान आणि तबकल पठाण या भावांनी दोन्ही मुलांना मारहाण केली. रागाच्या भरात त्यांनी लहान मुलांचे अर्धे केस कापले, त्यांना चपलांचा हार घातला. तसेच परिसरातून या लहान मुलांची नग्न धिंड ही काढली. हे दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर इरफान ज्यावेळी मुलांना मारहाण करत त्यांना चपलाचा हार घालत होता, त्यावेळी त्याचा भाऊ तबकल पठाण या सर्व प्रकाराचे मोबाईलमध्ये रेकोर्डिंग करत होता. रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियामध्ये पसरवून टाकला.

दरम्यान, या प्रकारची पुष्टी केल्यानंतर आणि व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर हिललाईन पोलिसांनी तातडीने या दोन्ही भावांच्या विरोधात पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या दोघांव्यतिरिक्त आणखी एक जण सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या कृत्यामध्येअजून कोणी सहभागी होते का? याबाबत पुढील तपास सुरु केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two man arrested for child harassment in ulhasnagar
First published on: 21-05-2017 at 14:34 IST