अंबरनाथ: चोर असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ पूर्वेतील दुर्गापाडा परिसरात समोर आली आहे. सुरज परमार आणि सुरज कोरी अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ ते २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

हेही वाचा >>> आदित्य ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात, शाखांना भेटी देण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन तरुण चोरी करत असल्याच्या संशय काही नागरिकांना आल्याने त्यांनी या मृत तरुणांना पकडून मारहाण सुरू केली. बघ्यांनी त्यात भर घालत या तरुणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि अंबरनाथच्या डॉ. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी केलेल्या तपासात हे दोन्ही तरुण अंबरनाथ पूर्वेतील प्रकाश नगर येथे राहत असल्याची माहिती आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १५ ते २० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. असून सीसीटीव्ही चित्रण मिळवत आरोपींना अटक करण्यात येईल, पोलिसांनी दिली आहे.