ग्रामस्थांकडून बंदर रस्त्याच्या कामाचे मोजमाप करणाऱ्या साहित्याची मोडतोड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू : वाढवण वाकडी खांजन, ओसर येथे सव्‍‌र्हेअर आणि त्याच्यासोबत कर्मचाऱ्यांना, जीपीएस स्टँड, जमिनीत घातलेले सिमेंटचे पोल तसेच इतर साहित्याची मोडतोड करून पिटाळून लावले. ही मोजणी जेएनपीटीसाठी किंवा अन्य कोणासाठी करण्यात येत होती, हे कळू शकले नाही. वाढवण बंदराविरुद्ध घोषणाबाजी करून नागरिकांनी तीव्र विरोध केला.

वरोर वाढवण समुद्रकिनाऱ्यावर वाकडी खांजणाजवळ कोणीतरी वाढवण बंदराच्या रस्त्याच्या कामाचे मोजमाप करीत असल्याचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरताच तेथे शेकडो लोकांनी धाव घेतली. त्या वेळी वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी इंटर कॉन्टिनेंटल आणि टेक्नोक्रेटस प्रा. लि. आंतरराष्ट्रीय सल्लागार तंत्रज्ञ प्रा. लि. कंपनीचे सव्‍‌र्हेअर अर्जुनसिंग काविआ, शहापूर जाट, नवी दिल्ली हे मोजमाप करीत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे अशीच मोजणी ओसार गावाजवळील चाररस्ता येथे चालली असल्याचे ओसार गावातील तरुणांना कळताच तेथील जमावानेही तेथील मोजमाप बंद पाडून पिटाळून लावले.

वाढवण बंदर उभारणीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आणि डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे प्रलंबित असताना तसेच बंदर उभारणीस कोणतीही परवानगी मिळालेली नसताना, वाढवण-वाणगाव चारोटीपर्यंतच्या ३४ कि.मी. लांबीच्या आणि १८० मीटर रुंदीच्या रस्त्याचे बेकायदेशीर मोजमाप करणे, हे न्यायाची पायमल्ली करणारे आहे. ही बाब वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देईल, असे संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान येते येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाढवण, वरोर आणि ओसार गावातील जमावांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या साहित्याची मोडतोड करून, आल्या पावलांनी परत पिटाळून लावले.

More Stories onबंदरPort
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers protest against vadhavan port zws
First published on: 28-06-2022 at 00:36 IST