येथील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त व माजी संचालिका विमलाताई कर्वे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. विमलाताई कर्वे या १९५० च्या सुमारास ठाणे येथे वास्तव्यास आल्या. तेव्हाच्या नौपाडा विभागात शिक्षणाची सोय नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी डॉ. चिं. श्री. कर्वे, ग. ना. गाजरे यांच्या सहकार्याने १९५२ मध्ये नौपाडामध्ये प्राथमिक शाळेची सुरुवात केली. सरस्वती सेकंडरी स्कूल, सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा, सरस्वती मंदिर पूर्वप्राथमिक शाळा, सरस्वती मंदिर क्रीडा विज्ञान सांस्कृतिक केंद्र आणि सरस्वती प्रज्ञा केंद्राच्या रूपाने त्यांचे कार्य समाजमान्यता पावले आहे. शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सरस्वती क्रीडा संकुल, तिसरा मजला, मल्हार सिनेमासमोर, नौपाडा, ठाणे येथे विमलाताई कर्वे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2015 रोजी प्रकाशित
विमलाताई कर्वे यांचे निधन
येथील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त व माजी संचालिका विमलाताई कर्वे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले.
First published on: 13-02-2015 at 01:38 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vimaltai karve dies at