scorecardresearch

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे ठाणे पालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

सामान्य जनतेची कामे विहित मुदतीत पूर्ण व्हावी यासाठी राज्य शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल व नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल व वेब पोर्टल सुरू केले आहे.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे ठाणे पालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
ठाणे महापालिका आयुक्त  डॉ. विपीन शर्मा

ठाणे : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महापालिकेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या सुचनेनुसार राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबरपासून सुरु झालेला हा सेवा पंधरावडा २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या सेवा पंधरावडा अंतर्गंत सामान्य जनतेची कामे विहित मुदतीत पूर्ण व्हावी यासाठी राज्य शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल व नागरी सेवा केंद्र, विभागांचे स्वत:चे पोर्टल व वेब पोर्टल सुरू केले आहे.

त्या माध्यमातून जनतेची कामे ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सेवा पंधरवड्यात विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे, मागणीपत्र देणे अशा कामांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाचा मोहिम कालावधीत निपटारा करावा अशा सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या