ठाणे : ठाणे शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला प्रकल्प वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विभागातील अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प ६५.३२ टक्के पूर्ण झाला असून डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घोडबंदरच्या कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होणारा ताण देखील कमी होऊ शकतो.

मुंबईपासून जवळचे शहर असल्याने ठाणे शहरात गृह खरेदी वाढली आहे. घोडबंदर भागात प्रकल्पांची उभारणी अधिक होत आहे. त्यामुळे रस्ते मार्गावर देखील वाहतुकीचा ताण आला असून दररोज शहरात वाहतुक कोंडीची समस्या भेडसावत आहे. शहरातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वेगाड्यांत होणारी गर्दी कमी करण्यासाठी २०१६ मध्ये वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मार्गिकेच्या निर्माणाचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या या मार्गिकेच्या कामांमुळे घोडबंदर भागात मुख्य रस्ते, सेवा रस्त्यांवर लोखंडी पत्रे उभारण्यात आले आहेत. या पत्र्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून घोडबंदर भागात राहणाऱ्या नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

mumbai, Western Railway , Extend Harbor Line up to Borivali, Expected in Three Years, Completion Expected in Three Years , Harbor Line western railway,
पुढील तीन वर्षात हार्बर मार्गावरून थेट बोरिवलीपर्यंत प्रवास, रेल्वे प्रशासनाकडून कामे हाती
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

हेही वाचा : कोकण किनारपट्टी ‘सिडको’ला आंदण;  विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती, ‘नगरविकास’च्या अधिकारांना कात्री

मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी एमएमआरडीए, महापालिका अभियंते आणि वाहतुक पोलिसांसोबत पाहाणी केली. येथील कापुरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, वाघबीळ, कासारवडवली आणि भाईंदर पाडा येथे प्रत्यक्ष पाहाणी करण्यात आली. डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी अभियंत्यांनी दिली. त्यामुळे सुमारे दीड ते दोन वर्षांत ठाणे शहरात मेट्रो धावण्याची शक्यता असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली कामाची स्थिती (एकूण ६५.३२% काम पूर्ण)

  • भक्ती पार्क ते अमर महल या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके – भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टी टी, अनिक नगर बस डेपो, सिद्धार्थ कॉलनी- कामाची स्थिती – ४६.५३%
  • गरोडिया नगर ते सूर्या नगर*या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सुर्यानगरकामाची स्थिती – ८७.८१ %
  • गांधिनगर ते सोनापूर या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गांधिनगर, नवल हाऊसिंग, भांडुप महापालिका, भांडुप मेट्रो, शंग्रीला, सोनापूरकामाची स्थिती – ५४%
  • मुलुंड ते माजिवडा या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका स्टेशन, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडाकामाची स्थिती – ९०.९८%
  • कापूरबावडी ते कासारवडवली या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- कापूरबावडी, मानपाडा, टीकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवलीकामाची स्थिती – ५५.३८ %

हेही वाचा : ठाणे : सार्वजनिक शौचालयाला महिलांनी लावले टाळे, शौचालये दुरावस्थेबाबत नागरिकांनी व्यक्त केला संताप

मेट्रो मार्ग क्रमांक ‘४ अ’ कासारवडवली ते गायमुख

कासारवडवली ते गायमुख या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गोवनी पाडा ,गायमुख कामाची स्थिती – ६७.३१% तसेच ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रोसाठी महापालिकेने १० हजार ४१२.६१ कोटी रुपयांचा डीपीआर तयार असून तो केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु अद्याप केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने अंतर्गत मेट्रो प्रकल्प रखडला आहे, असे विचारे यांनी स्पष्ट केले.