बदलापूरः गेल्या पंधरा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणे काठोकाठ भरले आहेत. जिल्ह्यातील विविध शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्याच्या घडीला ९७ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर पुण्यातील ज्या धरणातून उल्हास नदीत पाणी सोडले जाते ते आंध्रा धरणही ९७ टक्के भरले आहे. भातसा धरणातही ९९ टक्के पाणी असल्याने जिल्ह्याची पाणीचिंता मिटली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
Loss of crops on three and a half thousand hectares due to unseasonal rain
बुलढाणा : ‘अवकाळी’चा शंभर गावांना फटका, साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी; ३०९ घरांची पडझड
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ

हेही वाचा >>> डोंबिवली पश्चिम काही भागाचा वीज पुरवठा आज सात तास बंद

यंदाच्या वर्षात पावसाच्या लहरीपणामुळे जून महिना कोरडा गेला होता. जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्याची तीव्रता कमी होती. जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली होती. तर जिल्ह्यातील बहुतांश शहरे आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला होता. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र सप्टेंबर महिन्यापासून पावसाने पुनरागमन केले. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे पावसाने सप्टेंबर महिन्याची सरासरी अवघ्या पंधरा दिवसातच ओलांडली. या पावसामुळे काही अंशी रिकामे झालेले जलस्त्रोत अर्थात धरणे पुन्हा काठोकाठ भरले आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मिरा भाईंदर, अंबरनाथ या पालिका आणि ग्रामीण भागाच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या बारवी धरणात मंगळवारी ९६.१४ टक्के इतका पाणीसाठा होता. सध्य़ाच्या घडीला धरणात ३२५.७७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षात हाच पाणीसाठा ९५ टक्के इतका होता. तर पुणे जिल्ह्यातील आंध्रा धरणातून उल्हास नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे उल्हास नदी बारमाही वाहते अशा आंध्रा धरणही यंदा काठोकाठ भरले आहे. आंध्र धरणात यंदा ९७.४२ टक्के पाण्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षात हेच धरण सप्टेंबर महिन्यात ७८ टक्क्यांवर होते. त्यामुळे आंध्रा धरणातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. शहापुरजवळील भातसा धरणातही मंगळवारपर्यंत ९९.३८ टक्के पाणी होते. त्यामुळे भातसा धरणही भरले आहे. या जलस्त्रोतांच्या भरण्यामुळे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे.