ठाणे :  जोरदार पावसामुळे ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्र येथे मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाल्याने पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे रविवार, २३ जुलैपर्यंत शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून यामुळे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ठाणे जिल्हा भाजपमध्ये रविंद्र चव्हाण यांची ताकद वाढली

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Mira bhayandar Municipal Corporation, Levies 10 percent Water Supply Benefit Tax, Citizens Express Anger, politician express anger, politician demand cancel Water Supply Benefit Tax, mira bhayandar citizen, marathi news,
भाईंदर : पाणी पुरवठा लाभ कर आकारणीवरून नागरिक संतप्त; महापालिकेने कर रद्द करावा अशी राजकीय पुढार्‍यांची मागणी
Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्र येथे मोठ्या प्रमाणात कचरा गोळा झाला आहे. पंपाच्या मुखाशी कचरा अडकत असल्याने नदी पत्रातून पुरेशा पाण्याचा  उपसा करणे शक्य होत नाही. रविवार, २३ जुलैपर्यंत ठाणे शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी पाणी काटकसरीने तसेच गाळून व उकळून वापरावे असे आवाहनही ठाणे महापालिकेने केले आहे.