*एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असून, कुटुंब निराधार झाले असेल, तर ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजने’द्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो.
*या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (१५००० किंवा त्यापेक्षा कमी) असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो.
*या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज करता येतो.
*अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
*कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला आवश्यक.
*मृत व्यक्ती कुटुंबप्रमुख होती, त्या संदर्भातील तलाठय़ांकडून मिळणारा दाखलाही आवश्यक
*त्याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वारसा प्रमाणपत्र, कुटुंब दारिद्रय़रेषेखालील असल्यास त्याचा दाखला आदी जोडणे आवश्यक आहे.
*या कागदपत्रांची छाननी झाल्यावर एक महिन्यानंतर संबंधित कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो.
*www.thane.nic.in  या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना मिळू शकतो.

tv10