scorecardresearch

Premium

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

भिवंडी येथील काल्हेर भागात एका २८ वर्षीय महिलेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागात एका २८ वर्षीय महिलेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन दिवस तिचा मृतदेह घरामध्येच पडून होता. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेचा प्रियकर विकास अडगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल  करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 काल्हेर येथील जय माता दी कंपाऊंड परिसरात गेल्या दोन वर्षांपासून महिला ही तिचा प्रियकर विकास अडगळे आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. परंतु विकासला दारू पिण्याचे व्यसन होते. यातून तो तिला वारंवार मारहाण करत असे. २१ एप्रिलला त्यांच्या घराला कुलूप असतानाही घरातून मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांनी तात्काळ याची माहिती नारपोली पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुलूप तोडून घराच्या आत प्रवेश केला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती नारपोली पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांना दिली. गुरुवारी महिलेच्या बहिणीने विकास अडगळे याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

crime
खळबळजनक: पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या
man committed suicide mumbai
मुंबई : मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या
crime
बाणेर भागात सराफी व्यावसायिकाची मित्रावर गोळीबार करून आत्महत्या; जखमीची प्रकृती चिंताजनक
mumbai firing marathi news, mumbai firing 17 people died marathi news, 16 firing incidents mumbai, mumbai firing incidents marathi news
नऊ वर्षांमध्ये मुंबईत गोळीबाराच्या १६ घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू

तीन दिवस मृतदेह घरातच

विकास आणि महिला यांच्यात प्रेमसंबंध होते. ती पतीला सोडून तिच्या पाचवर्षीय मुलीसोबत विकासकडे राहण्यास आली होती. काही दिवसांपूर्वीच महिलेने तिच्या मुलीला माहेरी राहण्यास नेले होते. त्यामुळे विकास आणि ती महिला असे दोघेच घरामध्ये वास्तव्यास होते. १८ एप्रिलला  महिलेने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी विकास घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार पाहिला. त्यामुळे तो घाबरून घरातून निघून गेला. सांयकाळी पुन्हा घरी परतल्यानंतर त्याने मृतदेह खाली काढून ठेवला. नंतर त्याने कुलूप लावले व कळव्याला पळून आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman commits suicide strangulation bhiwandi areas house police ysh

First published on: 30-04-2022 at 00:02 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×