कल्याण – कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड समर्थक म्हणून मिरविणाऱ्या पण ते भाजपचे नसावेत, अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे. यामुळे महायुतीत काही लोक घोळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कार्यकर्त्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार शिंदे यांचा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीच्या मंत्री, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. कोट्यवधीची विकास कामे खासदार शिंदे यांनी या मतदारसंघात केली आहेत. त्यांची ही सर्व कामे लोकमानसात पोहोचली आहेत. त्यामुळे यावेळी विजयाची हॅटट्रिक करून खासदार शिंदे मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघात विजयी होतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष लांडगे यांनी व्यक्त केला.

Chhagan Bhujbal - Sharad Pawar
“पक्ष फुटला नसता तर मीच मुख्यमंत्री झालो असतो”, शरद पवारांच्या ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
Sunil Tatkare, advice, Hemant Godse,
संभ्रम करणारी विधाने टाळावीत, सुनील तटकरे यांचा हेमंत गोडसे यांना सल्ला
Swati Maliwal has accused Delhi CM Arvind Kejriwal
केजरीवालांच्या घरी ‘आप’ च्या महिला खासदारांना मारहाण; कारण काय? कोण आहेत स्वाती मालीवाल?
Ganesh Naik, Shinde sena, thane,
गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना
Ganesh Naik, Shinde sena, thane,
गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना
Complaint of NCP to Election Commission against Ravindra Dhangekars campaign
रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात ‘घड्याळ’; राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Jayant Patil, public money, GST,
जनतेच्या पैशांची जीएसटीच्या माध्यमातून लूट, जयंत पाटील यांचा आरोप
i will not yield to the pressure of the rulers says Dhairyashil Mohite-Patils reply to dendendra Fadnavis
प्रसंगी तुरूंगवास पत्करेन; पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही, फडणवीसांना मोहिते-पाटलांचे प्रत्युत्तर

हेही वाचा – कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड श्रीकांत शिंदे वादाची पुन्हा ठिणगी, गायकवाड समर्थकांचा शिंदेंचे काम न करण्याचा निर्धार

कल्याण पूर्वेत काही जण ते भाजपचे नसावेत, पण आपण भाजप कार्यकर्ते आहोत, असे भासवून ते खासदार शिंदे यांच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकारामुळे कल्याण लोकसभेत महायुतीच्या प्रचारात नाहक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. अशा लोकांमुळे महायुतीच्या प्रचारात कोणताही फरक पडणार नाही. खासदार शिंदे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच आहेत, असे लांडगे यांनी सांगितले.

आमदार गायकवाड यांनी गोळीबाराचे केलेले कृत्य चुकीचेच आहे. पण त्यांचे समर्थक जर चुकीच्या पद्धतीने प्रचार करून आमदार गायकवाड यांना आता जामीन होईल ते बाहेर येतील असा कांगावा करत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे. जामिनाच्या भ्रमात त्यांनी राहू नये असे लांडगे यांनी तथाकथीत भाजप कार्यकर्त्यांना सुनावले.

हेही वाचा – ठाण्यात महायुतीचा उमेदवार कोण ? शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे सूचक विधान

कल्याण पूर्वेत आपण आमदार गायकवाड समर्थक आहोत, असे सांगून कोणी खासदार शिंदे यांच्या विरोधात काम करत असेल तर त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. अशा मंडळींची भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी लांडगे यांनी केली.