भगवान मंडलिक

कल्याण- येथील मोहने गावात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्रावर बंदुकीतून गोळी झाडून त्याला गंभीर जखमी केले आहे. बंदुकीची गोळी जीभ फाडून घशात अडकली असल्याची माहिती उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी तपासणीनंतर रुग्णाच्या नातेवाईकांना दिली आहे. यानंतर जखमीला उपचारासाठी  कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
uncle rapes 18 Yr old niece in panvel
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

मोहने गावात सुशील महंतो आणि त्याचे पाच मित्र बुधवारी सायंकाळी एकत्र गप्पा मारत बसले होते. एका मित्राजवळ बंदूक होती. गप्पा सुरू असताना एका मित्राने जवळील बंदुकीतून एक गोळी सुशीलच्या दिशेने झाडली. तो गम्मत करत आहे, असे सुशीलला वाटले. त्याने चेहऱ्यावर हात ठेवला. मित्राने सुशीलच्या तोंडाच्या दिशेने गोळी झाडल्याने गोळी हाताचा पंजामधून आरपार जाऊन जीभ फाडून घशात अडकली. इतर मित्रांनी सुशीलला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन सुशीलला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुशीलवर मित्राने गोळीबार का केला. त्याने बंदूक कोठुन आणली आणि गोळी झाडण्याचे कारण काय, याचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरू केला आहे.