प्लास्टिकचे प्रदूषण केवळ जमिनीपुरते मर्यादित नाही, तर महासागरातही प्लास्टिकचे प्रदूषण फार आहे. डच एरोस्पेसचा विद्यार्थी बॉयन स्लॅट याने सागरातील प्लास्टिक काढण्यासाठी एक स्वस्त पण मस्त योजना आखली आहे. त्यात पैसे खर्च होतील तसेच पैसा वसूलही होणार आहे. स्लॅट हा विशीतला तरुण असून त्याने आखलेली योजना जगातील १०० वैज्ञानिकांना योग्य वाटली आहे. महासागरांमध्ये १०० ते १४२ दशलक्ष टन प्लास्टिक कचरा आहे, तो वाढतोच आहे. अतिनील किरण, खारे पाणी व काही यांत्रिक बलांच्या मदतीने या कचऱ्याचे विघटन करता येते; पण त्यात विषारी पदार्थ सागरात मिसळतात. ते माशांच्या मार्फत माणसाच्या शरीरातही पोहोचू शकतात. अमेरिकेच्या चार्लस मूर याने प्रथम १९९७ मध्ये महासागर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती. ग्रेट पॅसिफिक गारबेज गायर या भागात सर्वाधिक प्रदूषण आहे, त्यामुळे तेथे स्लॅट हा विद्यार्थी त्याची योजना राबवणार आहे. त्यात तो व्ही आकाराचे महाकाय दोन होस पाइप समुद्रात ५० कि.मी. खोलीपर्यंत नेणार आहे व खाली नेताना दर ४ किलोमीटरला त्यांचे वजन केले जाईल. या होस पाइपना फिल्टर असतील, ते कचरा पकडतील; पण सागरी प्राण्यांना नुकसान करणार नाहीत. दर ४५ दिवसांनी होस पाइपमधील प्लास्टिक कचरा रिकामा केला जाईल. या कचऱ्याचा फेरवापर करता येईल. एक टन प्लास्टिक ५० युरोला विकले जाईल या हिशेबाने जर्मन कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेच्या अंदाजानुसार फेरवापरामुळे ३०० ते ४०० युरोही मिळतील, प्लास्टिक कचरा स्वच्छ केल्यानंतर त्यातून ५०.८ अब्ज डॉलरचा महसूलही मिळू शकतो. महासागरातील प्लास्टिक कचरा पहिल्या तीन मीटपर्यंत असतो त्यामुळे सगळा कचरा आठ लाख डॉलर खर्च करून स्वच्छ करता येईल. स्लॅट याने त्यासाठी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून पैसा गोळा केला आहे. सागरी जीवशास्त्रज्ञ लार्स गटो यांच्या मते एवढा मोठा होस पाइप असलेले यंत्र तयार करणे शक्य वाटत नाही. तसेच ते घातकही असेल.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2014 रोजी प्रकाशित
महासागरातील प्लास्टिक प्रदूषणावर मात
प्लास्टिकचे प्रदूषण केवळ जमिनीपुरते मर्यादित नाही, तर महासागरातही प्लास्टिकचे प्रदूषण फार आहे. डच एरोस्पेसचा विद्यार्थी बॉयन स्लॅट याने सागरातील प्लास्टिक काढण्यासाठी एक स्वस्त पण मस्त योजना आखली आहे.

First published on: 27-09-2014 at 08:02 IST
मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overcome on plastic pollution in oceans