News Flash

धावाल तर (जास्त) जगाल!

चालण्याच्या किंवा धावणांच्या गुणांनी सगळ हेच परिचित असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे विरळातच मोडतात. आळस, कंटाळ्याची पुटे झटकण्याची इच्छा असली, तर त्यांच्यासाठी शुभवार्ता आहे.

| August 2, 2014 01:05 am

चालण्याच्या किंवा धावणांच्या गुणांनी सगळ हेच परिचित असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे विरळातच मोडतात. आळस, कंटाळ्याची पुटे झटकण्याची इच्छा असली, तर त्यांच्यासाठी शुभवार्ता आहे. रोज निव्वळ सात मिनिटे धावण्याने (रनिंग) हृदयविकार व पक्षाघाताने मृत्यूची शक्यता ५५ टक्क्य़ांनी कमी होते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वैज्ञानिकांच्या मते रोज केवळ सात मिनिटे हळूहळू धावण्याने आरोग्यास फायदा होतो. जे लोक धावण्याचा व्यायाम करीत नाहीत त्यांच्या तुलनेत तो व्यायाम करणाऱ्यांना हृदयविकार व पक्षाघातने मृत्यू येण्याची शक्यता कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेने आठवडय़ात ७५ मिनिटे धावण्याचा व्यायाम करण्याची शिफारस यापूर्वीच केली असली तरी त्याचे आरोग्यविषयक फायदे काय आहेत हे सिद्ध झाले नव्हते. संशोधकांच्या मते त्यांनी १५ वर्षांच्या काळात १८ ते १०० वयोगटातील ५५ हजार १३७ प्रौढांची माहिती घेतली व त्यात त्यांचा जीवनकाल व धावणे यांचा काही संबंध आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न केला. धावणारे लोक हे जे लोक धावण्याचा व्यायाम करीत नाहीत त्यांच्यापेक्षा तीन वर्षे जास्त जगतात असे त्यांना दिसून आले. न धावणाऱ्या लोकांच्या तुलनेत धावणाऱ्या लोकांना सर्व कारणांनी येणाऱ्या मृत्यूचा धोका ३० टक्के कमी असतो तर हृदयविकार व पक्षाघाताचा धोका ४५ टक्के कमी असतो. धूम्रपान टाळणे, लठ्ठपणा टाळणे व अतिरक्तदाब टाळणे याबरोबरच लोकांना रोज सात मिनिटे धावण्याचा सल्ला देणे गरजेचे आहे. धावण्याने मिळणारे हे फायदे तुम्ही किती दूर, किती सातत्याने धावता यावर अवलंबून नाहीत, लिंग, वय, बॉडी मास इंडेक्स, दारू पिणे व धूम्रपान करणे हे सर्व घटक धावण्याचे फायदे तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत याचा अर्थ दारू व धूम्रपान केले तरी चालते असे नाही कारण त्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतो. जे लोक ५१ मिनिटे म्हणजे ६ मैल अंतर ताशी ६ मैलपेक्षा कमी वेगाने धावत होते किंवा आठवडय़ातून एक-दोनदाच धावण्याचा व्यायाम करीत होते त्यांना जे लोक धावत नव्हते त्यांच्यापेक्षा मृत्यूचा धोका कमी होता.
आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीचे डीसी ली यांनी हा शोधनिबंध लिहिला असून जे लोक आठवडय़ाला तासापेक्षा कमी काळ धावतात त्यांनाही जे लोक आठवडय़ाला तीन तास धावतात त्यांच्या सारखाच फायदा मिळतो. जे लोक सहा वर्षे धावण्याचा व्यायाम करीत होते त्यांना जास्त फायदा झालेला दिसून आला. त्यांची कुठल्याही कारणाने मृत्यूची शक्यता २९ टक्के कमी झाली तर हृदयविकार व पक्षाघाताने मृत्यूची शक्यता ५० टक्क्य़ांनी कमी झाली. त्यांच्या मते धावणे हा इतर व्यायामांपेक्षा चांगला व्यायाम प्रकार असून ५ ते १० मिनिटे धावण्याने इतर व्यायाम १५ ते २० मिनिटे केल्याने जितका फायदा होतो तेवढा मिळतो. इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन हेल्थ सायन्सेसचे डॉ. ची पँग वेन यांनी म्हटले आहे की, ५ मिनिटे धावण्याने होणारा फायदा हा १५ मिनिटे चालण्याने मिळणाऱ्या फायद्याइतका असतो. २५ मिनिटे धावण्याने मिळणारा फायदा २५ मिनिटे चालण्याने मिळणाऱ्या फायद्याच्या चौपट असतो. धावण्यासाठी तुम्ही अ‍ॅथलिट असायची गरज नाही. तुम्ही सहजगत्या पाच-दहा मिनिटे मातीच्या पृष्ठभागावर पळणे आवश्यक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:05 am

Web Title: run you will live you
Next Stories
1 इंधननिर्मिक पालक
2 आटपाट स्मार्ट नगर
3 श्रीलंकेतला सुगंधी वृत्तव्यवसाय !
Just Now!
X