News Flash

नवे मोबाइलनिष्कर्ष!

मोबाइलचा आरोग्याला असलेला धोका या विषयी वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल दरवर्षी दिले जातात. मोबाइल हा बिनतारी संदेशवहनावर चालतो. त्यात टॅबलेट ही साधनेही आलीच.

| July 5, 2014 12:01 pm

मोबाइलचा आरोग्याला असलेला धोका या विषयी वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल दरवर्षी दिले जातात. मोबाइल हा बिनतारी संदेशवहनावर चालतो. त्यात टॅबलेट ही साधनेही आलीच. बायोइनिशिएटिव्ह वर्किंग ग्रुप या संस्थेने याबाबत मध्यावधीचा अहवाल जाहीर केला आहे. २०१२ ते २०१४ दरम्यान मोबाइल फोनच्या वापरामुळे मेंदूत कर्करोगाची गाठ होते, असा अनेक अभ्यासकांचा दावा आहे. सध्या सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी रेडिओ कंप्रतांचे वर्गीकरण एफसीसी/ आयईईई व आयसीएनआयआरपी हे सुरक्षा निकष पुरेसे नाहीत. स्वीडनच्या ओरेब्रो विद्यापीठातील लेनार्ड हार्डेल यांनी सांगितले की, मोबाइल किंवा बिनतारी फोनमुळे गिलोमा (मेंदूचा कर्करोग) अकॉस्टिक न्यूरोमा होतो. २११ पैकी १४४ अभ्यासात असे दिसून आले की, रेडिओ लहरींमुळे चेतासंस्थेवर ६८ टक्के परिणाम होतो. हे अहवाल २०१४ मधील आहेत. २०१२ च्या (१५० पैकी ९३) अभ्यासानुसार ९० टक्के लोकांच्या चेतासंस्थेवर परिणाम झाला. रेडिओ लहरींमुळे डीएनएवर विपरीत परिणाम होतो, असे ११४ पैकी ७४ अभ्यासात आढळून आले. हा परिणाम ६५ टक्के होता. अगदी कमी कंप्रतेच्या रेडिओ लहरींमुळे मेंदूवर ८३ टक्के परिणाम होतो असे ५९ पैकी ४९ अभ्यासात दिसून आले. मोबाइल टॅबलेट्स हे विनाकारण जैविक ताण निर्माण करतात व त्याचा मनावरही परिणाम होतो. उपकरणांमधील सूक्ष्म लहरींमुळे मुले अध्ययनावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, असे बायोइनिशिएटिव्ह अहवालाच्या संपादक सिंडी सेज यांचे मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2014 12:01 pm

Web Title: the results of a new mobile
टॅग : Mobile,Thats It
Next Stories
1 अभिनवनिर्माते..
2 कर्णबधिर बाळांना संजीवनी
3 गोष्ट छोटीच डोंगराएवढी !
Just Now!
X