News Flash

ट्रेक डायरी

सह्य़ाद्री ग्रुपतर्फे येत्या २१-२२ सप्टेंबर रोजी लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्यावर भटकंतीचे आयोजन केले आहे.

| September 20, 2013 08:49 am

राजमाची पदभ्रमण
सह्य़ाद्री ग्रुपतर्फे येत्या २१-२२ सप्टेंबर रोजी लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्यावर भटकंतीचे आयोजन केले आहे. वनसृष्टीने व्यापलेल्या या किल्ल्यावर इतिहास आणि निसर्गाची अनेक गुपीते उघड होतात. अधिक माहितीसाठी निरंजन खाडे (८९८३४०६३०५) यांच्याशी संपर्क साधावा.
कर्नाटकातील वन्यसफारी
एकूण क्षेत्रफळाच्या २० टक्के भाग वनांनी आच्छादलेल्या कर्नाटकात भारतातील २५ टक्के हत्ती वास्तव्यास आहेत. कर्नाटकातील सह्य़ाद्रीसुद्धा जैवविविधता संपन्न आहे. समुद्रसपाटीपासून ५६० मीटर उंचीवरील अगुंबेला दक्षिण भारताचं चेरापुंजी म्हणतात. येथे ७-८ हजार मि.मी. पाऊस दरवर्षी पडतो. राजनाग व सिंहपुच्छ माकड या येथील विशेष प्रजाती आहेत. चिकमंगळूरजवळच्या भद्रा अभयारण्यात मिश्र पानझडी व सदाहरित जंगल आहे. वाघ, गवा, हत्ती, रानकुत्रा, अस्वल, सांबर, चितळ, हरण, भेकर, पिसोरी, शेकरू व उडती खार हे प्राणी येथे सापडतात. पक्ष्यांमध्ये साकोत्री, करडी रानकोंबडी, निलगिरी रानकबूतर, मलबार धनेश व थोरला धनेश सापडतात. अशा या कर्नाटकातील वन्यसफारीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने १६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
जिम कार्बेट
जंगल सफारी निसर्ग सोबती तर्फे येत्या ८ ते १३ डिसेंबर दरम्यान उत्तराखंडमधील जिम कार्बेट जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ांपासून अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच विविध जातीचे दुर्मिळ पक्षीही या जंगलात आढळतात. या सफारीमध्ये याशिवाय नैनितालपासून १५ किलोमीटरवर असणाऱ्या सातताल आणि पानगोट येथेही भेट दिली जाणार आहे. या भागात हिवाळय़ात मोठय़ा संख्येने पक्षी येत असतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.
हरिश्चंद्रगड भटकंती
‘एनईएफ’तर्फे येत्या २१-२२ सप्टेंबर रोजी हरिश्चंद्रगडावर पावसाळी भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अपूर्वा जडये (८६९८६५६५६५) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा जंगल सफारी
ट्विीन आऊटडोअर तर्फे नाताळच्या सुट्टीत २७ ते २९ डिसेंबर दरम्यान ताडोबा जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबा जंगल हे वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघांबरोबर बिबटय़ा, अस्वल, रानडुकरे, हरिण, सांभर असे अनेक प्राणी येथे या सफारीत पाहण्यास मिळणार आहेत. तसेच स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधीही या सफारीत मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क – आर्चिस सहस्त्रबुद्धे ९८९२१७२४६७, लोकेश तर्डलकर ९८२०९९०३८९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 8:49 am

Web Title: trecking places
Next Stories
1 सायकलवरून सीमेपार
2 ट्रेक डायरी: ‘खारफुटीं’चा अभ्यास
3 ‘हनुमान तिब्बा’शी झुंज
Just Now!
X