भूशास्त्रीय अभ्यासासाठी गढवाल मोहीम
उत्तराखंडच्या गढवाल हिमालय भागात जूनमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर तिथल्या भूशास्त्रीय अभ्यासासाठी पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच एक गिर्यारोहण मोहीम पूर्ण केली. राजीव बाहेती, संजय जांडीआल आणि अभिजित उभे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेत या गिर्यारोहकांनी उत्तरकाशीच्या पुढे गंगोत्री, भगीरथी नदी, गंगा नदी उगमस्थान आदी भागांतून शिवलिंग शिखराच्या अगदी २०० फुटांपर्यंत मजल मारली. या संपूर्ण मोहिमेत या गिर्यारोहकांना प्रतिकूल हवामान, हिमवर्षांव, पर्वतावरून होणारा दगडांचा मारा यांचा सामना करावा लागला. परंतु या स्थितीतही त्यांनी आपली मोहीम पूर्ण केली. या मोहिमेत ढगफुटीनंतर गढवालमधील बदलत्या भूस्तरीय स्थितीचाही अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरील अहवाल ते योग्य त्या संस्थेकडे सुपूर्द करणार आहेत.
साहस शिबिर
‘भोसला अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन’तर्फे येत्या २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान साहस शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात गिर्यारोहण, पदभ्रमण आदी साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ०२५३-२३०९६१८, ९८८१५४७२८० या क्रमांकावर संपर्क साधावा.
वेळास, सुवर्णदुर्ग अभ्यास सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या ९ आणि १० नोव्हेंबर रोजी वेळास, बाणकोट, अंजर्ले, हर्णे आणि सुवर्णदुर्ग अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
वासोटा पदभ्रमण
निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असणाऱ्या वासोटा उर्फ व्याघ्रगडाच्या पदभ्रमणाचे २३ -२४ नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूरच्या ‘न्यू हायकर्स ग्रुप’तर्फे आयोजन केले आहे. या मोहिमेदरम्यान इतिहासाबरोबरच पशू-पक्षी, वनस्पती आदी जैवविविधतेची माहितीही दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९७६२३१७४८४ किंवा ९८८१७४७३४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
राजगड मोहीम
‘एसपीआर हायकर्स’तर्फे येत्या ९ आणि १० ऑक्टोबर रोजी राजगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा चिमट (९९२०३६०३३६) आणि राजेंद्र जाधव (८६९१८३७८३३)