चादर ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ७ ते १७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान लेह-लडाख परिसरातील चादर ट्रेकचे आयोजन केले आहे. समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असलेल्या या बर्फाळ प्रदेशातून होणाऱ्या पदभ्रमंतीत बर्फवृष्टी अनुभवता येते. हिमालयातील जैवविविधता, निसर्ग या साऱ्यांचे या ट्रेकमध्ये विहंगम दर्शन होते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम संधी ठरू शकते. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चला मेळघाटला
निसर्ग संरक्षण संस्थेतर्फे मेळघाटातील जंगलामध्ये २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान निसर्ग शिबिराचे आयोजन केले आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्य़ात २०० चौरस किलोमीटर क्षेत्रात हे जंगल पसरले आहे. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प असलेल्या या जंगलात वाघांशिवाय रानगवे, अस्वल, चितळ, सांबर, रानकुत्री आदी प्राणी, तसेच शेकडो प्रकारचे पक्षी, दुर्मिळ वनस्पती आढळतात. या सर्व वन्यजीवांचे निरीक्षण आणि अभ्यासाची संधी या शिबिरामुळे मिळणार आहे. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर किंवा ल्लू२ं्रल्ल्िरं@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उजनी पक्षी निरीक्षण सहल
‘हिरवाई’ संस्थेतर्फे येत्या १६ ते १७ जानेवारी २०१६ रोजी उजनी धरणक्षेत्रातील कुंभारगाव येथे पक्षी निरीक्षण अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी जलाशयावर विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येतात. रोहित, चित्रबलाक, पाणकावळे, विविध प्रजातींच्या बदकांची उपस्थिती यामध्ये लक्षणीय असते. या पक्ष्यांचे निरीक्षण, अभ्यास आणि छायाचित्रण करण्यासाठी ‘हिरवाई’तर्फे या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. तरी इच्छुकांनी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पक्षीनिरीक्षण अभ्यास सहल
हिवाळा सुरू झाला, की पुण्याजवळील कवडी आणि भिगवण येथील पाणथळ स्थळांवर स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी होऊ लागते. रोहित, बलाक, विविध प्रजातींची बदके, करकोचे आदी पक्ष्यांचे येथे थवेच्या थवे दिसतात. याच पक्ष्यांच्या निरीक्षण आणि अभ्यासासाठी ‘वसुंधरा’तर्फे ८ फेब्रुवारी रोजी एका सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.

रायगड पदभ्रमण
‘प्लस व्हॅली अॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या १२ आणि १३ डिसेंबर रोजी रायगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी श्रीपाद (८३८००५४९८८) किंवा प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta trek diary
First published on: 10-12-2015 at 02:47 IST