प्रियांका मोहिते ‘ल्होत्से’ मोहिमेवर

सातारा येथील एव्हरेस्ट कन्या प्रियांका मोहिते जगातील सर्वोच्च अशा चौथ्या क्रमांकाच्या ‘ल्होत्से’ शिखर सर करण्यासाठी रवाना होत आहे.

सातारा येथील एव्हरेस्ट कन्या प्रियांका मोहिते जगातील सर्वोच्च अशा चौथ्या क्रमांकाच्या ‘ल्होत्से’ शिखर सर करण्यासाठी रवाना होत आहे. हे शिखर सर केले तर ती राज्यातील दुसरी तर एव्हरेस्ट पाठोपाठ ‘ल्होत्से’ करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरेल.
प्रियांका मोहिते हिने गेल्या वर्षी एव्हरेस्ट शिखर (उंची ८८४८ मी.) सर केले होते. या वेळी परतीच्या वाटेवर असतानाच ल्होत्से सर करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. ही दोन्ही शिखरे सर केलेला आशिष माने आणि अर्जुन वाजपेयी यांच्याबरोबर कर्नल नीरज राणा यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. प्रचंड शारीरिक क्षमता, मानसिक संतुलन, निसर्गाची साथ आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर हे शिखर सर करू असा विश्वास तिने या मोहिमेवर निघताना व्यक्त केला. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी तिने सह्य़ाद्रीत अनेक मोहिमा केल्या. तसेच कळकराय, िलगाणा, नवरानवरीचा डोंगर आदी सुळके अनेक वेळा सर केले आहेत. ल्होत्से या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून ८५१६ मीटर आहे. अत्यंत अवघड असलेल्या या शिखराची चढाई ८५ अंशांत आहे. मार्ग अतिशय अरुंद आहे. विरळ वातावरणाबरोबर शिखराकडून सतत होणारा दगडांचा मारा ही या चढाईतील मोठी आव्हाने आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka mohite on everest mission