वासोटा पदभ्रमण
‘आनंदयात्रा पर्यटन’तर्फे येत्या २, ३, ४ मे रोजी जावळीच्या वासोटा गडावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत व्याघ्रगड दर्शन, जावळीच्या जंगलातून पदभ्रमण, मशालींच्या उजेडात रात्री जंगलालगत तंबूत राहण्याचा अनुभव घेता येईल. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याची अभ्यास सहल
‘टूर डी पुणे’ या संस्थेतर्फे उन्हाळय़ाच्या सुटीत मुलांसाठी पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या सहलीचे आयोजन केले आहे. यामध्ये पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था, संग्रहालये आणि निसर्गस्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ८९८३०२५०७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पानशेत पदभ्रमण
‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स अॅकाडमी’तर्फे येत्या २७ एप्रिल रोजी पानशेत येथे पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत गुहेतला महादेव आणि देवराईत भटकंती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ७३८५८५३१९९ संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी, लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.   Email – abhijit.belhekar@expressindia.com

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treck diary
First published on: 23-04-2014 at 08:31 IST