scorecardresearch

ट्रेक डायरी

छत्रपती शिवरायांची राजधानी रायगडाच्या अभ्यास सहलीचे ‘ओरायझन’तर्फे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड दर्शन
छत्रपती शिवरायांची राजधानी रायगडाच्या अभ्यास सहलीचे ‘ओरायझन’तर्फे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या सहलीत १० ते १५ वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतील. या सहलीत अभ्यासकांच्या नजरेतून रायगडाच्या इतिहासाचे, तिथल्या स्थापत्याचे दर्शन घडवले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी डॉ. मिलिंद पराडकर (९६१९००६३४७, ७७४४९०९४७४) किंवा सुहास कोकणे (९८२०६१८७०१) यांच्याशी संपर्क साधावा.
 कळसूबाई- रतनगड पदभ्रमण
सह्य़ाद्री ट्रेकिंग गिर्यारोहण संस्थेतर्फे दिवाळीच्या सुटीत ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखर, रतनगड, भंडारदरा धरण, रंधा धबधबा, अमृतेश्वर मंदिर आदी भागात भटकंतीचे आयोजन केले आहे. या भटकंतीत गिर्यारोहणाचे शास्त्रीय शिक्षण, सराव, साहित्याची ओळख करून दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी मानसी सदामते (९६७३४७४८९०) यांच्याशी संपर्क साधावा.
निसर्ग शिबीर
ब्ल्यू व्हेल नेचर असोसिएशनतर्फे ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान १२ ते २१ वयोगटासाठी  लोणावळ्याजवळील लोहगड, विसापूर किल्ल्यावर निसर्ग साहस शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी श्रीराम कोळी (९८९२९०३८६३) किंवा विनोद रकटे (८९७६७७८२४३) यांच्याशी संपर्क साधावा.
भरतपूर पक्षिनिरीक्षण
‘निसर्ग सोबती’ तर्फे खास पक्षिनिरीक्षण आणि छायाचित्रणासाठी राजस्थानमधील प्रसिद्ध भरतपूर येथे २ ते ५ जानेवारी २०१४ मध्ये एका विशेष सहलीचे आयोजन केले आहे. युनेस्कोने भरतपूरला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. येथील केवलादेव राष्ट्रीय उद्यानात ३७४ हून अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. विविध जातीची बदके, खंडय़ा, धनेश, करकोचे, बगळे, सूर्यपक्षी, घुबड, सारस क्रौंच, चित्रबलाक आदी दुर्मिळ पक्षी येथे आढळतात. याशिवाय असंख्य जातीची फुलपाखरे, कोल्हा, नीलगाय, तपकिरी मुंगूस, खवले मांजर, जंगली मांजर सारखे प्राणीही येथे आढळतात. प्राणी आणि पक्ष्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
निसर्ग साहस शिबीर
‘अ‍ॅडव्हेंचर लाइफ’ तर्फे सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये साहस आणि निसर्गभ्रमंती शिबिराचे आयोजन केले आहे. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या
शिबिरात सहभागी होण्यासाठी राहुल येलंगे (९४२३००३९७३) यांच्याशी संपर्क साधावा.
ट्रेल सिंधुसागर
यूथ होस्टेल्स असोसिएशनच्या मालाड युनिटतर्फे ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान अलिबाग, कोर्लई किल्ला, नांदगाव, काशीद आणि जंजीरा किल्ला या भागात भ्रमंतीचे आयोजन केले आहे. नितांतसुंदर समुद्रकिनारे, सागरी किल्ले, फणसाडसारखे अभयारण्य ही या भ्रमंतीची वैशिष्टय़े आहेत. अधिक माहिती नोंदणीसाठी वसंत घाडीगावकर (९८९२११५१८८) किंवा अक्षय मुळ्ये (९८१९२१२९७५) यांच्याशी संपर्क साधावा.
साहस शिबीर
‘माउंटन क्वेस्ट’ तर्फे ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान भीमाशंकर येथे साहस शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये रॉक क्लाइबिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग, नेचर ट्रेल इत्यादी साहसी क्रीडा प्रकारांचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. एव्हरेस्टवीर चेतन केतकर या शिबिराचे खास आकर्षण आहे. अधिक माहितीसाठी समीर (९८२२६५७२३९), विश्वनाथ (९४२२३०४९१५), सोनाली (९८८११५३५७३) यांच्याशी संपर्क साधावा.
सामाजिक प्रकल्पांना भेट
हार्मनी हॉलिडेज- बोरिवली पूर्वतर्फे १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ या बाबा आमटे यांच्या प्रकल्पांच्या भेटीचे आयोजन
केले आहे. अधिक माहितीसाठी पूर्वा देशमुख (९८१९६२८५३६) यांच्याशी संपर्क साधावा.
जामनगर पक्षिनिरीक्षण
गुजराथमधील जामनगर हे ऐतिहासिक स्थळ त्याच्या गौरवशाली इतिहासाबरोबरच देशोदेशीच्या येणाऱ्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील निसर्ग निर्मित बेटे, समुद्र किनारे, पाणथळ जागांच्या परिसरात अनेक स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडते. यामध्ये फ्लेमिंगो, पेलिकन्स, केन्स, ब्लॅकनेक स्टार्क, विविध प्रकारची बदके दिसतात. अशा या जामनगरची १६ ते २० जानेवारी दरम्यान ‘निसर्ग टूर्स’तर्फे सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत समुद्रीजीवनाची सैरही केली जाणार आहे. निसर्ग, पक्षिनिरीक्षण, छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही भ्रमंती मेजवानी ठरू शकते. या सहलीत जामनगरच्या गौरवशाली इतिहासाचेही दर्शन होणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

मराठीतील सर्व Trek इट ( Trekit ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या