ट्रेक डायरी: साहस शिबिराचे आयोजन

‘माऊंटन हायकर्स’ संस्थेतर्फे येत्या २६, २७ एप्रिल रोजी वरसगाव येथे ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी साहस शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी वल्लरी पाठक (७७५७०२३५६७) यांच्याशी संपर्क साधावा.

साहस शिबिराचे आयोजन

‘माऊंटन हायकर्स’ संस्थेतर्फे येत्या २६, २७ एप्रिल रोजी वरसगाव येथे ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी साहस शिबिराचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी वल्लरी पाठक (७७५७०२३५६७) यांच्याशी संपर्क साधावा.

वन्यजीव अभ्यास सहल
‘इनसर्च आऊटडोअर्स’तर्फे येत्या २२ ते २७ एप्रिल दरम्यान आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील अनुक्रमे काझीरंगा आणि ईगलनेस्ट अभयारण्यात सहलीचे आयोजन केले आहे. काझीरंगा अभयारण्य हे मुख्यत्वे एकशिंगी गेंडय़ांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय या जंगलात पट्टेरी वाघ, रानम्हैस, हत्ती आदी प्राणीदेखील दिसतात. अरुणाचल प्रदेशातील ईगलनेस्ट अभयारण्यात पक्षी आणि बेडकांच्या विविधप्रजाती आढळतात. अधिक माहितीसाठी ९८५०८२६४३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बांधवगड जंगलभ्रमंती
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या ६ ते ९ जून दरम्यान बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघांबरोबरच बिबटय़ा, गवा, अस्वल, सांबर, चितळ, वानर, भेकर अन्य प्राणीही दिसतात. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे अनेक दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.

‘सांदन व्हॅली’ पदभ्रमण
‘एसपीआर हायकर्स’ तर्फे १९ एप्रिल रोजी ‘सांदन व्हॅली’ पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६), राजेंद्र (८६९१८३७८३३) यांच्याशी संपर्क साधावा.
मून लाईट ट्रेक
‘नोमॅड्स ’तर्फे येत्या १२ ते १४ एप्रिल दरम्यान ‘मून लाईट कोस्टल ट्रेक’चे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Trek diary

ताज्या बातम्या