‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’

हिमालय म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच म्हणावा लागेल. बर्फाच्छादीत पर्वत, खोल वाहत्या नद्या, सूचीपर्णी वृक्षांचे जंगल, दऱ्याखोऱ्यातील गावे आणि विविध रंगांत न्हाहून निघणारे आकाश या साऱ्यांमुळे इथला निसर्ग प्रेमात पाडत असतो. या साऱ्यांमध्ये हिमालयात फुलणारी खोरी हाही एक आकर्षणाचा विषय असतो. या फुलांच्या बहरासाठी हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३२५० मीटर उंचीवर आहे. या खोऱ्यामध्ये जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये हजारो प्रकारची फुले उमलतात. फुलांचा हा बहर पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो भटके या खोऱ्याची वाट तुडवत इथे येतात. या खोऱ्यात फुलांशिवाय विविध प्रकारचे पक्ष्यांचेही दर्शन घडते. या भटकंतीमध्येच ‘हेमकुंड साहिब’ या शिखांच्या पवित्र स्थानासही भेट देता येते. इथे एक सुंदर तलावही आहे. बर्फाच्छादीत पर्वत, फुलांनी भरलेली खोरी, नितळ पाण्याचे तलाव हे सारेच या भटकंतीत लक्ष वेधून घेते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. अशा या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ ट्रेकचे हिमगिरी ट्रेकर्स फाउंडेशनतर्फे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान आयोजन केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com