‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर’तर्फे ६ डिसेंबर रोजी रेहेकुरी अभयारण्य येथे पदभ्रमण आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रीपाद (८३८००५४९८८) किंवा प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.

कलावंतीण पदभ्रमण
आव्हान संस्थेच्या वतीने १२ आणि १३ डिसेंबर रोजी किल्ले कलावंतीण पदभ्रमण आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८३३३४४५१० या क्रमांकावर संपर्क करावा.

मुंबईतील किल्ले
महाराष्ट्रातील साडेतीनशे दुर्गाविषयी आपण साऱ्यांनीच ऐकलेले आहे. मात्र मुंबईत आपल्या उशापायथ्याशी असलेल्या मुंबईतल्या किल्ल्यांविषयी आपल्याला किती माहिती आहे? मुंबईतील हे दुर्गवैभव जाणून घेण्यासाठीच एका मोहिमेचे आयोजन केले आहे. होरायझन संस्थेतर्फे १३ डिसेंबर रोजी मुंबईतील शिव, धारावी, शिवडी, वरळी, माहीम आणि वांद्रे या प्रमुख किल्ल्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध केली आहे. या सफ रीमध्ये या दुर्गाचे दर्शन, त्यांची माहिती, इतिहास आणि दुर्ग संकल्पना यांचा परिचय करून दिला जाईल. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी डॉ. मिलिंद पराडकर (९६१९००६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.